शहादा : तालुक्यातील शहाणा येथे बुधवारी पोलीसांनी तब्बल २३ लाख ३६ हजार ७९६ रुपयांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, आरोपीने कापसाच्या शेतामध्ये गांजा सदृश्य झाडांची लागवड करून त्यांची जोपासना केल्याचे पाहून पोलीसही चक्रावले. ३३३ किलो ८२५ ग्राम गांजा जप्त करण्यात असून याप्रकरणी शहादा पोलीसात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शहाणा येथील रहिवाशी गणेश शिवाजी भंडारी यांनी कापसाच्या शेतामध्ये गांजा सदृश्य झाडांची लागवड करून त्यांची जोपासना केल्याचे पोलिसांना दिसून आले. शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गणेश शिवाजी भंडारी यांच्या शेतात धाड टाकून सदर गांजाची तीन हजार सहाशे गांजा सदृश्य झाडे तपासणीत गुंगीकारक मनोव्यापारावर परिणाम करणारे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शेतातील सर्व झाडे जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांद्वारे जप्त करण्यात आलेल्या हिरव्या गांजाच्या झाडांची किंमत 23 लाख 36 हजार 796 रुपये असल्याचे पोलिस तपासात नमूद करण्यात आले आहे. यातील आरोपी गणेश शिवाजी भंडारी याने आपल्या कपाशीच्या शेतात विनापरवाना बेकायदेशीर रित्या गांजा सदृश्य झाडांची लागवड करून त्याची जोपासना केल्याने.
शहादा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनो व्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी राजेंद्र मोरे हे करीत आहे.