महिलांसोबत लिप लॉक करून पळून जायचा, अखेर ठोकल्या बेड्या

crime : बिहारच्या जमुईमध्ये एका अनोख्या ‘सीरियल किसर गँगचा’ पर्दाफाश झाला आहे. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण दिवसा महिलांची छेड काढतात आणि रात्री चोरीच्या घटना करतात.  या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या तरुणासह त्याच्या टोळक्याला शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढे होतं. अखेर पोलिसांनी सापळा रचत आरोपी तरुणासह त्याच्या इतर ४ साथीदारांना अटक केली आहे.

बिहारच्या जमुई जिल्ह्यात एका ‘सीरियल किसर’ने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आरोपी तरुण हा अनोळखी महिला आणि मुली रस्त्यावरून जात असताना अचानक यायचा आणि त्यांना जबरदस्ती किस करून पळून जायचा. या संपूर्ण प्रकाराचे काही व्हिडीओ देखील समोर आले होते.

https://twitter.com/UtkarshSingh_/status/1635208847672606721?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1635208847672606721%7Ctwgr%5E0ccc5168f8a5aa03017234464845291f9c00cc54%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.saamtv.com%2Fnational-international%2Fserial-kisser-arrested-by-jamui-police-he-kissed-woman-viral-video-ssd92

भरदिवसा घडणाऱ्या या घटनेमुळे जमुई जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या तरुणाला तातडीने अटक करा, अशी मागणी महिलांकडून केली जात होती. यासंदर्भातील तक्रारी सुद्धा पोलिसांत दाखल झाल्या होत्या. आरोपीचा शोध घेणं पोलिसांपुढे आव्हान होतं. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

१० मार्च रोजी जमुईच्या सदर हॉस्पिटलच्या आवारात चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचारी महिला मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. अचानक एक तरुण भिंतीवरून उडी मारून आवारात आला. त्याने महिलेला पाठीमागून पकडलं आणि जबरदस्तीने चुंबन घेतले.

अचानक आपल्यासोबत घडलेल्या या भंयकर प्रकारामुळे महिला भयभीत झाली. महिलेला या तरुणाला विरोध केला. मात्र, तरी देखील त्याने महिलेचे चुंबन घेणं काही सोडले नाही. काम फक्ते होताच, आरोपी तरुणाने महिलेला ढकलून दिलं आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर महिला प्रचंड संतापली. तिने अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना तरुणाची ओळख पटली. पोलिसांनी सापळा रचत आरोपी तरुणासह त्याच्या इतर साथीदारांना अटक केली. हे टोळकं भरदिवसा महिलांसोबत गैरवर्तन करायचं आणि रात्री जबर चोऱ्या करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.