संत मुक्ताई मंदिराच्या कामाला येणार गती, वाचा सविस्तर

मुक्ताईनगर : कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरया तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामास २ कोटी ५४ लाख रुपये निधी वितरीत करण्यात येणार आहे. यामुळे मंदिराच्या कामाला गती येणार आहे.

आ. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर, त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे.

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्रांना निधी वितरीत करण्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात भरीव निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. या तरतुदीतून श्री संत मुक्ताई मंदिर, कोथळी या तीर्थक्षेत्रातील विकास कामांसाठी उर्वरित २ कोटी ५३ लाख ६७ रुपये इतका निधी जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात येत आहे.