जळगाव : तालुक्यातील किनोद येथील ३० वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेतले होते. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवार ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला. याबाबत जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाळ नारायण सपकाळे (३०) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गोपाल सपकाळे हा आई पत्नी दोन मुलांसह विनोद गावात वास्तव्याला होता. शेती व मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवारी २ जुलै रोजी त्याने दुपारी शेतात असताना विषारी औषध सेवन केले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली होती. नातेवाईकांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता त्याचा मृत्यू झाला.
याबाबत वैद्यकीय अधिकारी सुशांत निकुंभ यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात आई उर्मिला, पत्नी माधुरी, एक भाऊ, दोन मुलं आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.