---Advertisement---

जळगावात तरुणाला बेदम मारहाण; काय आहे कारण ?

---Advertisement---

जळगाव : रिक्षा मागे घेण्याचे सांगितल्याच्या कारणावरून एका तरूणाला रिक्षाचालकाकडून फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवार, ३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तौसीफ अली मुश्ताक अली सैय्यद (वय ३५) हा तरूण मलीक नगरात वास्तव्याला आहे. बुधवारी ३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता मुलतानी अपार्टमेंटजवळ रिक्षा मागे घेण्याचे सांगितल्याच्या कारणावरून तौसीफ अली याला रिक्षाचालक फैजान खान याने शिवीगाळ करत फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत केली.

जखमी झालेल्या तौसीफला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री १० वाजता दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षाचालक फैजान खान याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment