---Advertisement---

प्रेयसीला भेटायला गेला युवक; कुटुंबीयांनी पकडले रंगेहाथ; नंतर जे घडलं…

---Advertisement---

प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची बेदम मारहाण हत्या करण्यात आली. बिहारमधील जमुई येथे ही घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा एक तरुण आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी टाउन पोलीस स्टेशन हद्दीतील महिसौरी परिसरात गेला, त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांना रंगेहात पकडले आणि नंतर बेदम मारहाण केली. रणजीत साह यांचा १९ वर्षीय मुलगा रुपेश कुमार असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, तरुणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment