---Advertisement---
एरंडोल : एरंडोलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणीन विहरीत उडी घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना तालुक्यातील टोळी खु. या गावात घडली आहे.
सूत्रानुसार, तालुक्यातील टोळी येथील एका १८ वर्षीय युवतीचा विवाह करमाड येथे आज होणार होता. यासाठी घरामध्ये सर्व तयारी झाली होती. लग्न असल्याने आनंदाचे वातावरण पसरले होते. आजचे लग्न असल्याने सोमवारी (ता.२७) तिला वर पक्षाकडील मंडळी घेण्यासाठी येणार होते. करमाड येथे तिला सायंकाळी हळद लागणार होती. परंतु, त्यापुर्वीच मुलीची अंत्ययात्रा काढण्याची दुर्देवी वेळ आई-वडीलांवर आली.
नेमकी घटना काय?
टोळी येथे सोमवारी (ता.२७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास या नियोजित वधूने शेतातील विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली. या प्रकारामुळे तिच्या आई- वडिलांसह लग्नानिमित्त आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी एकच हंबरडा फोडला. तर विवाह समारंभासाठी सजलेल्या मंडपातच तिच्या अंत्ययात्रेची तयारी करावी लागली. एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील करीत आहेत.