---Advertisement---
Jalgaon Crime : जळगाव शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, दररोज लहान-मोठ्या घटना समोर येत आहेत. अशात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमला लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकला होता. ही घटना ताजी असतानाच आता जळगावातील या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथे वास्तव्यास होते. त्यामुळे जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील त्यांच्या घराला कुलूप होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
रात्री ही चोरी झाली, मात्र केव्हा चोरी झाली हे सांगता येणार नाही. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. माझ्या रुममधील ५ ग्रॅमच्या ४ सोन्याच्या अंगठ्या आणि ३५ हजार रुपये रोख होते. गोपाळच्या रुममधून सात-आठ तोळ्याचे सोने चोरीला गेले आहे. रक्षा खडसे यांची रुमही शेजारीच आहे. तिथेही सामान उचकलेले आहे. वॉचमन सुट्टीवर होता.
पोलिस घटनास्थळी, तपास सुरू…
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमला लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.









