तरुण भारत लाईव्ह । २० फेब्रुवारी २०२३। मध्य प्रदेशातील भोपाळजवळील सिहोरच्या कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या रुद्राक्ष महोत्सवात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत होते. दरम्यान याबाबत कुबलेश्वर धाम प्रमुख पंडित प्रदीप मिश्रा यांनी मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले पंडित मिश्रा?
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘एबीपी न्यूज’ या स्वायत्त वृत संस्थेतर्फे मिश्रा यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. त्यात मिश्रा म्हणाले की, आपल्या धर्मग्रंथांमध्ये रुद्राक्षांना खूप मान देण्यात आलेला आहे. मात्र या रुद्राक्षांमध्ये कोणताही चमत्कार किंबहुना तंत्र मंत्र केल्याचा दावा आम्ही केलेला नाही. आम्ही फक्त भगवान शिव यांच्यावर आस्था ठेवतो. यामुळे या रुद्राक्षांमध्ये कोणतेही मंत्र, तंत्र किंवा चमत्कार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सिहोरी येथे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण येणार असे म्हटले जात होते. मात्र आम्ही कोणालाही आमंत्रित केलेले नाही. भगवान शिव यांचा दरबार सगळ्यांसाठीच खुला आहे. त्यामुळे इथे कोणीही येऊ शकतो.