मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतेच नवीन वर्षातील बँकेचे पहिले पतधोरण जाहीर केले. यामध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदरात (रेपो रेट) ०.२५ बेस पॉईंटने वाढ जाहीर केली असून यासह केंद्रीय बँकेचा व्याजदर ६.५% वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कर्जदारांना आज आणखी एक धक्का बसला आहे.
काय म्हणाले शक्तीकांत दास?
गेल्या सुमारे तीन वर्षांत विविध आव्हानांमुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांसमोर चलनविषयक धोरण पातळीवर आव्हान निर्माण झाले आहे. यापूर्वी 7 डिसेंबर रोजी आरबीआयकडून रेपो दरात 35 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली होती. रेपो दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम बँकांकडून ग्राहकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजदरावर होणार आहे. यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.