नवी दिल्ली : तुम्ही जर आज सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झालेली दिसून आली. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये शुक्रवारी घसरण दिसून आली. गुरुवारी 60856 रुपयांवर बंद झालेल्या सोन्याव्यतिरिक्त चांदीचा भावही लाल चिन्हासह व्यवहार करताना दिसत आहे.
बुधवारी सोन्याच्या किमतीने जबरदस्त उसळी घेत विक्रमी उच्चांक गाठला होता. या दिवशी सोन्याने 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा भाव ओलांडला होता. आता त्या दिवसापासून त्यात घट दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोन्याचा भाव 341 रुपयांनी घसरून 60515 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव अवघ्या 1 रुपयांनी घसरून 74554 रुपये प्रति किलोवर पोहोचला.
फेब्रुवारीमध्येही सोन्याने वेगाच्या बाबतीत पूर्वीचा विक्रम मोडला. मात्र, त्यानंतरच्या घसरणीनंतर आता पुन्हा या मौल्यवान धातूची चढ-उतार होत आहे. 2023 च्या दिवाळीत दोन्ही मौल्यवान धातू वेगाचा नवा विक्रम निर्माण करतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या काळात सोने 65,000 रुपये आणि चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
जळगावातील सोने चांदीचा दर
जळगावमध्ये देखील सोन्याच्या किमतीत घसरण झालेली आहे. आज सकाळी सोन्याचं किमतीत 300 रुपयाची घसरण झालेली असून यामुळे सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60,600 रुपयावर आला आहे. तर चांदी स्थिर आहे. आज चांदीचा एक किलोचा दर 75,500 रुपये इतका आहे.