आज रात्री आकाशात एक अतिशय मनोरंजक दृश्य दिसणार आहे!

तरुण भारत लाईव्ह ।०१ फेब्रुवारी २०२३। खगोलशास्त्रीय घडामोडींची आवड असणाऱ्यांसाठी आज रात्री एक अतिशय मनोरंजक दृश्य दिसणार आहे. विशेष म्हणजे, तब्ब्ल ५० हजार वर्षानंतर आज बुधवारी, रात्री ९.३० वाजता हे दृश्य पहायला मिळणार आहे.

५० वर्षांनंतर आज बुधवारी रात्री ९.३० वाजता एक धूमकेतू पृथ्वीवरील आकाशातून जाणार आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून जानेवारी 2023च्या सुरुवातीच्या आठवड्यात तो पृथ्वीच्या वरच्या आकाशात येत आहे. विशेष म्हणजे हे भारतातील अनेक राज्यांसह जगातील अनेक भागांमधून पाहिले जाऊ शकते.

आकाशात धूमकेतू पाहण्यासाठी, आपल्याला स्वच्छ आणि गडद आकाश आवश्यक आहे धूमकेतू अपेक्षेप्रमाणे तेजस्वी नाही आणि धूमकेतू आकाशात फिरताना पाहण्यासाठी तुम्हाला दुर्बिणीची आवश्यकता असेल. भारतात हा धूमकेतू पश्चिम बंगाल, ओडिशा, लडाख आणि ईशान्य राज्यांसह भारताच्या अनेक भागांमध्ये दिसेल.