ODI Cricket Rules । वनडेमध्ये होणार बदल; जाणून घ्या काय आहेत नियम ?

#image_title

ODI Cricket Rules । सध्या टी-20 क्रिकेट खूप लोकप्रिय झाले आहे. टी-20 क्रिकेटच्या या शर्यतीत एकदिवसीय क्रिकेट मागे पडले आहे. पण आता एकदिवसीय क्रिकेटला रोमांचक बनवण्यासाठी आणि त्यात नवसंजीवनी देण्यासाठी आयसीसी क्रिकेट समितीने क्रांतिकारी बदलाची योजना आखली आहे.

दुबईत झालेल्या आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत एकदिवसीय क्रिकेटमधील नियम बदलण्याची शिफारस करण्यात आली आहे. ज्यामुळे या फॉरमॅटमध्ये मोठा बदल होईल. आयसीसीच्या या क्रिकेट समितीमध्ये सौरव गांगुली, महेला जयवर्धने, व्हीव्हीएस लक्ष्मण, शॉन पोलॉक, डॅनियल व्हिटोरी, रॉजर हार्पर आणि जय शाह उपस्थित होते. यावेळी वनडेमध्ये 25 षटकांसाठी 2 नवीन चेंडू ठेवण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

अर्थात, आयसीसी समितीने एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या 25 षटकांसाठी दोन नवीन चेंडू वापरावेत, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर एकच चेंडू वापरावा. सध्या 50 षटकांसाठी दोन्ही संघाकडून दोन नवीन चेंडू वापरले जातात. एकदिवसीय सामन्यात दोन चेंडूंचा वापर केल्यामुळे गोलंदाजांना मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

50 षटकांपर्यंत दोन नवीन चेंडू असल्याने फलंदाजांना मोठे फटके खेळणे सोपे जाते. आयसीसी समितीने ही शिफारस सर्व कर्णधारांना पाठवली आहे. कर्णधारांच्या संमतीनंतरच त्याची अंमलबजावणी होईल. 25 षटकांसाठी फक्त दोन चेंडू वापरण्याचा नियम असेल तर एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजही खेळात येतील. त्यांना रिव्हर्स स्विंग मिळेल आणि लेग स्पिनरही खेळात मोठे योगदान देतील.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येही मोठ्या बदलांची शिफारस
ICC क्रिकेट समितीने शिफारस केली आहे की आता पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये 3 कसोटी मालिका असावीत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे मुख्यतः दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. फक्त भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मोठ्या कसोटी मालिका खेळतात.

या गोष्टींमुळे कसोटी क्रिकेटला चालना मिळणार नाही. आयसीसी समितीनेही डे नाईट टेस्टला प्रोत्साहन देण्याबाबत बोलले. फक्त ऑस्ट्रेलियात पिंक बॉल टेस्ट सतत खेळली जाते; बीसीसीआयने गेल्या दोन वर्षांपासून पिंक बॉल टेस्ट घेतली नाही. आयसीसीचा विश्वास आहे की पिंक बॉल टेस्टमुळे स्टेडियममध्ये जास्त लोक येतील.