उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, तुम्हाला माहित आहे का?

तरुण भारत लाईव्ह । ७ एप्रिल २०२३। उन्हाळा  सुरू झाला आहे. उन्हाळ्यात  घाम जास्त येतो. तसेच उन्हाळ्यात तहान देखील जास्त लागते. अनेक लोक फ्रीजमधील पाणी पितात. पण बरेच लोक मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठामधील पाणी पितात. उन्हाळ्यात माठातील स्वच्छ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहे.  माठातील पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

अनेक लोक पाणी थंड करण्यासाठी फ्रीजचा वापर करतात. फ्रीजमधील पाणी खूप थंड होते. जास्त थंड पाणी प्यायल्याने घशासंबंधित समस्या निर्माण होतात. परंतु माठामधील पाणी प्यायल्यानं घशाच्या संबंधित समस्या तुम्हाला जाणवणार नाहीत. पाणी पिताना पाण्याच्या पीएच पातळीकडे विशेष लक्ष द्यावे. पाण्याची पीएच पातळी जास्त असेल तर शरीराच्या आतील अवयवांना खूप नुकसान होऊ शकते. माठात ठेवलेल्या पाण्याची पीएच पातळी संतुलित राहते. माठामुळे पाण्यातील अम्लीय घटक संतुलित राहतात. माठातील पाणी प्यायल्याने शरीराची पीएच पातळीही संतुलित राहते.