तरुण भारत लाईव्ह । २३ मार्च २०२३ । मार्च एडिंग झाल्यानंतर एप्रिल महिन्याची सुरुवात होते. या महिन्यात अनेक गोष्टी बदल्या जातात. तर दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक नवे नियम लागू होतात. यंदा आर्थिक वर्षाच्या सुरुवात होणाऱ्या महिन्यात अनेक गोष्टी बदल्या जाणार आहेत. म्हणूनच केवळ सामान्य नियमच नाही तर अनेक करांशी संबंधित अनेक नियमही या दिवसापासून बदलतात. तर नेमके कुठले नियम बदलणार आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
7.5 लाखांचे उत्पन्न करमुक्त असेल
अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकपलीय प्रस्तावानुसार, आतापासून देशातील नवीन कर प्रणाली अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. त्याच वेळी, नवीन कर प्रणालीमध्ये, 50,000 रुपयांच्या मानक कपातीचा लाभ उपलब्ध होईल. अशा प्रकारे, सामान्य माणसाचे 7.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आयकरमुक्त असेल.
नवीन कर व्यवस्था डीफॉल्ट असेल
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात आणखी एक गोष्ट सांगितली होती की, आतापासून नवीन आयकर प्रणाली डिफॉल्ट प्रणाली असेल. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही आयकर विभागाच्या साइटवर आयकर रिटर्न भरण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला आधीच नवीन कर व्यवस्था निवडलेली मिळेल. तसेच तरीही तुम्ही जुन्या कर प्रणालीची निवड करू शकता.
सोन्याच्या हॉलमार्किंगशी संबंधित नियम बदलतील
सोन्याच्या हॉलमार्किंगशी संबंधित नियमांमधील गोंधळ दूर करण्यासाठी सरकारने आता त्यात समानता आणण्याची योजना आखली आहे. हा नवा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. आता 4 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) असलेले दागिने देशात उपलब्ध होणार नाहीत. त्याऐवजी आता फक्त 6 अंकी HUID असलेले दागिने खरेदी-विक्री करता येणार आहेत.
आधार-पॅन लिंक असणे आवश्यक आहे
जर तुम्ही 31 मार्च 2023 पर्यंत तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल. मग तुमचा पॅन क्रमांक अवैध ठरणार आहे. म्हणजेच १ एप्रिल २०२३ पासून तुमचा आधार आणि पॅन लिंक असणे आवश्यक आहे.
एलपीजीच्या किमती वाढू शकतात
देशात साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढतात. कधी-कधी होत नाही पण, मार्चमध्ये घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 350 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.