Year Ender 2024 : संपायला अवघे काही दिवस उरले आहे. पण तुम्हाला हे माहितेय का ? की 2024 हे वर्ष सिनेमा क्षेत्रात खूप चर्चांमध्ये राहिलंय. बॉलिवूड, टेलिव्हिजन, आणि दक्षिण भारतीय सिनेमा क्षेत्रातील घटना, वादग्रस्त वक्तव्ये, आणि सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य… जाणून घेऊया 2024 मध्ये गाजलेल्या गंभीर घटनांविषयी.
या घटनांतील काही महत्त्वाचे मुद्दे
सलमान खानच्या घरावर गोळीबार – सलमानसारख्या मोठ्या कलाकारावर अशा प्रकारचा हल्ला होणे, आणि त्यामागे लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुन्हेगाराची जबाबदारी स्विकारणे, यामुळे देशभरातील चाहते धक्का बसले आहेत.
गुरुचरण सिंहचा बेपत्ता होणे – त्यांच्या चाहत्यांसाठी ही घटना मोठी धक्कादायक होती. परंतु, त्यांनी सुखरूप घरी परत येणे ही दिलासादायक बाब ठरली.
शाहजादा धामी आणि राजन शाही वाद – टेलिव्हिजन क्षेत्रातील निर्मात्यांमधील मतभेद आणि कलाकारांवरील आरोप हे चर्चेचा विषय बनले.
बिग बॉस मराठी वाद – आर्या आणि निक्कीच्या वादामुळे तसेच सूरज चव्हाणच्या विजयामुळे शो अधिक चर्चेत राहिला.
जिगराचे कलेक्शन वाद – दिव्या कुमार खोसलाने उघड केलेला सत्य आणि करण जोहर यांच्यातील वाद हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
धनुष-नयनताराचा वाद – साऊथ सिनेसृष्टीतील हा वाद प्रेक्षकांसाठी अनपेक्षित होता.
पुष्पा 2 आणि करणी सेनेची धमकी – या सिनेमाला मिळालेली धमकी आणि त्यावर दिग्दर्शकांची भूमिका पाहणे औत्सुक्याचे ठरेल.