---Advertisement---
अमळनेर : शहरातील न्यू प्लॉट भागातून दुचाकी चोरीला गेली असून अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रताप मिल कंपाऊंड भागात राहणारे अनिल अमृतकार हे गूळ बाजारात कामाला आहेत. १२ ऑक्टोबर रोजी ते आपले काम आटोपून सायंकाळी ६:३० वाजता न्यू प्लॉट भागात राहणारे त्यांचे चुलत बंधू स्वप्नील अमृतकार यांच्याकडे असलेल्या दुचाकीने (एमएच५४/ए४३२८) भाजीपाला देण्यासाठी गेले.
घरात भाजीपाला देऊन थोड्याच वेळात ते बाहेर आले असता त्यांना घराबाहेर लावलेली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात तक्रार दाखल केली. हेकॉ चंद्रकांत पाटील पुढील तपास करत आहेत.
खिचडी खायला नदीवर गेले अन् दुचाकी गमावली
खिचडी खायला नदीवर गेले आणि अन् इकडे दुचाकी चोरीला गेल्याची घटना दि. २२ ऑक्टोबर रोजी पाल परिसरात घडली आहे. नऊ मित्रांनी मिळून पाल परिसरात सुकी नदीवर अंघोळीला जाण्याचा आणि खिचडी खाण्याचा बेत केला. दुचाकी नदीपात्राकडे जात नाही. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी पाच दुचाकी लावल्या. मात्र परतल्यावर पाचऐवजी चारच दुचाकी आढळून आल्या. एक दुचाकी (एमएच१९/सीएच८७५९) आढळून आली नाही.
ही दुचाकी लक्ष्मीचंद जाधव यांच्या मालकीची आहे. परिसरात शोध घेऊनही दुचाकी आढळून आली नाही. पाल येथील नऊ मित्र नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी आणि खिचडी खाण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांच्या पाच दुचाकी डोंगराच्या पायथ्याशी लावल्या. मात्र परतल्यावर पाचपैकी एक दुचाकी आढळून आली नाही. या घटनेला १३ दिवस उलटले तरी चोरीला गेलेली दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









