चोरट्यांनी मिनी बँकेतून ४० हजारांची रोकड केली लंपास

---Advertisement---

 

तळोदा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनामध्ये वाढ होत असून पोलीसा यंत्रणेचे उपाय कुचकामी ठरत आहे. चोरी घटनाना अटकाव करण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. मिनी बँकेतून दि २० ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ४० हजार लंपास केल्याची घटना घडली आहे.

काही दिवसा पूर्वी मिनी बँकेतून रोख रक्कम तसेच बँकेतून रोख रक्कम काढून ती मोटर सायकलच्या डिक्कीत ठेवत असता ना ती रक्कम हिसाकावून नेण्याच्या प्रकार घडले होते. तसेच काही दिवसापूर्वी तालुक्यातील बोरद येथे दुकान फोडून मोबाईल व रोख रक्कम पळवून नेण्याची घटना ताजी असताना परत शहरातील मुख्य रस्त्यावरील मिनी बॅकेतून ४० हजार चोरट्यानी पसार झाल्याची घटना नुकतीच घडली, त्याच्या ही तपास लागलेला नाही.

तोवर पाच – सहा दिवसा पूर्वी तळोदा पोलीसाच्या नाकावर टिच्चून दामोदर नगर परिसरात दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहे. या घटनेमुळे तळोदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नवीन वसाहतीत राहाणाऱ्या नागरीकान प्रचंड भितीचे वातावरण तयार झाले आहे

मागील सात- आठ महिन्यांपूर्वी कॉलेज रोड येथील मिनी बँकेत अशाच प्रकारे चार लाख पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास झाली होती. त्यापाठोपाठ एक महिन्याने तळवे येथील शिक्षकाचे स्टेट बॅकेतून काढलेले पेन्शनचे ९ लाख रुपये दिवसाढवळ्या हातातून चोरीला गेले. त्यापैकी कोणतीच रोकड मिळविण्यात तळोदा पोलिस विभागाला यश मिळाली नाही.

त्यानंतर आता पुन्हा मिनी बँकेतून दि २० ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ४० हजार लंपास झाल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या चोरीबाबत योगेंद्र साठे यांनी तक्रारी अर्ज दाखल केला असून अज्ञाताविरुद्ध रात्री उशीरा पर्यन्त गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, शहरातील नवीन वसाहती झालेल्या चोऱ्या च्या तपास लावण्यात तळोदा पोलीसा यश आलेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---