---Advertisement---

शाळेला शिवजयंतीनिमित्त सुट्टी, चोरट्यांनी साधली संधी, दोन प्रोजेक्टर नेले चोरून

---Advertisement---

धुळे : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, महानगरपालिका शाळा क्रमांक आठ येथे डिजिटल रूम आहे. शिवजयंतीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याचे हेरत चोरट्यांनी संधी सांधली आहे. यामध्ये चक्क दोन प्रोजेक्टर आणि एक पेपरांची मोठी पिशवी चोरून पोबारा केला आहे. या प्रकणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बारापत्‍थर परिसरात महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक आठ आहे. या शाळेच्या डिजिटल रूममध्ये दोन प्रोजेक्टर लावलेले होते. महाशिवरात्री आणि शिवजयंतीची सुट्टी असल्याने शाळा दोन दिवसापासून बंद होती. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने डिजिटल रूमची खिडकी तोडून आत मध्ये प्रवेश केला आणि दोन महागडे प्रोजेक्टर आणि एक पेपरची पिशवी चोरून पोबारा केला. हा सर्व प्रकार आज शाळा उघडल्‍यानंतर लक्षात आला.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment