sport : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या ८ महिन्यांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. दरम्यान दुसऱ्या वनडे सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराहबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले शर्मा?
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही.
या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला जसप्रीत बुमराहबाबत प्रश्न विचारला गेला होता. याबाबत बोलताना शर्मा म्हणाला की, “बुमराह गेल्या ८ महिन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याची कमतरता तर जाणवतेय. मात्र आता आम्हाला सवय झाली आहे. मला वाटतं की, सिराज, शार्दुल आणि शमीने चांगली गोलंदाजी केली आहे. आमच्याकडे उमरान आणि उनाडकट देखील आहे.
काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. मात्र तो काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे तो आगामी आयपीएल स्पर्धेत देखील खेळताना दिसून येणार नाहीये.