ही स्वस्त इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये देणार ७०० किमीची रेंज!

नवी दिल्ली : किया लवकरच सर्वाधिक विकली जाणारी कार मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये आधीच Kia EV6 इलेक्ट्रिक एसयूव्ही ही प्रिमीयम इलेक्ट्रिक कार आहे. या कारची किंमत ६० ते ६५ लाखांत आहे. ड्रायव्हिंग रेंजबाबत बोलायचे झाल्यास कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार ७०८ सिंगल चार्जिंगमध्ये ७०८ किमी पर्यंतची रेंज देते. मात्र ही कार सामान्य माणसाच्या बजेटच्या बाहेर असल्याने कंपनी आणखी एक कार बाजारात लाँच करण्याची योजना आखत आहे जी कमी किंमतीत जास्त रेंज देईल.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रीक कारची क्रेझ ग्राहकांमध्ये प्रचंड वाढली आहे. इलेक्ट्रिक कार्सच्या शर्यतीत टाटा मोटर्स, महिंद्रा, ह्युंदाई, एमजी मोटर्स आणि किया इंडिया यांसारख्या ब्रँडचा समावेश आहे. मात्र अजूनही इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीचा टॉप गिअर पडलेला नाही. याचं कारण म्हणजे, कार्सच्या किंमती व त्यांची कमी असलेली रेंज!

या पार्श्वभूमीवर किया इंडियाचे नॅशनल सेल्स अँड मार्केटिंग हेड हरदीप सिंह बरार यांची मोठं विधान केलं आहे. काही वर्षांपूर्वी, Kia India ने बाजारात आपली नवीन Seltos फेसलिफ्ट सादर केली होती. या SUV सह, Kia ने भारतीय बाजारपेठेत सुमारे 4 वर्षांपूर्वी पाऊल ठेवले होते आणि आता हीच कार अपडेट करून मार्केटमध्ये सादर केली आहे. यावेळी, हरदीप सिंग बरार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत असे सांगितले की, सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची योग्य वेळ नाही. इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये सध्या कोणत्या प्रकारची आव्हाने दिसून येतात असे जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा बरार म्हणाले की, सध्या इलेक्ट्रिक व्हेइकलच्या सेगमेंटमध्ये ३-४ मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षे तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची घाई करू नका, असे त्यांनी म्हटलं आहे.

इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटपुढे ही आहेत ४ मोठी आव्हानं

इलेक्ट्रिक गाड्या बाजारात कमी असल्याने त्यांच्या निवडीचे कमी ऑप्शन्स सध्या ग्राहकांपुढे आहेत

पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार फार महागड्या आहेत. या कार्सच्या किंमती तब्बल ७०-८० टक्क्यांनी महाग आहेत.

चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता हे सुद्धा Ev- सेंगमेंटपुढे एक मोठे आव्हान आहे.

हरदीप सिंह यांच्या मते, 2025 पर्यंत मार्केटमध्ये अशा इलेक्ट्रिक वाहनांची एन्ट्री होईल ज्यांची रेंजही जास्त असेल आणि इलेक्ट्रिक इंफ्रास्ट्रक्चरही सुधारेल. बरार यांच्या मते, २०२५ नंतर इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ग्राहकांसाठी फायद्याचे ठरेल.