करदात्यांनो ITR भरण्यासाठी ही आहे शेवटची मुदत

मुंबई : अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ITR (इन्कम टॅक्स रिटर्न) दाखल करण्यासाठी ३१ जुलै २०२२ ही अंतिम मुदत दिली होती. या तारखेला आयटीआर दाखल करू न शकणार्‍या करदात्यांना आणखी एक संधी देत अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२२ देण्यात आली आहे. ज्या करदात्यांनी आयटीआर भरला आहे, परंतु दिलेली माहिती बरोबर नाही किंवा चूक झाली आहे, तर त्यात सुधारणा करावी लागेल. अशा करदात्यांना ३१ डिसेंबरपर्यंत सुधारित आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. सुधारित आयटीआरला अपडेटेड आयटीआर असेही म्हणतात.

करदात्यांना आयकर कायद्याच्या कलम २३४एफ अंतर्गत सुधारित आणि विलंबित ITR दाखल करण्यासाठी उशीरा दंड जमा करावा लागेल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या म्हणण्यानुसार ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना उशिरा दंड म्हणून १,००० रुपये भरावे लागेल, तर ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांना ५,००० रुपये दंड भरावा लागेल.