जळगाव : जर तुम्हालाही लग्नाच्या निमित्ताने सोने खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या आठवड्यात सर्वोच्च पातळीवर गेलेला सोन्याचा दर आता खाली येताना दिसत आहे. आज सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आलीय. दुसरीकडे मात्र चांदीचा भाव स्थिर असल्याचे दिसतेय. मात्र आगामी काही दिवसात सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
जळगावातील हा आहे आजचा सोने-चांदीचा भाव?
मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात बुधवारी सोन्याचा दर ६१ हजार रुपयांवर जो आतापर्यंत सर्वाधिक उच्चांक दर गाठला होता. मात्र त्यानंतर काही घसरण दिसून आलीय. आज सोमवारी सकाळी जळगाव सुवर्ण नगरीत 24 कॅरेट सोन्याचा दर 60,200 रुपये (विना जीएसटी) प्रति 10 ग्रॅम इतके आहे. आठवड्याच्या शेवटची दिवशी सोन्याचा दर 60,700 रुपये इतका होता. म्हणजे सोने 500 रुपयांनी घसरले आहे.
आज चांदीचा एक किलोचा भाव 74,600 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. दरम्यान, एप्रिल महिलाच्या पहिल्याच आठवड्यात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून आली असून त्यात तब्बल 2100 रुपयाने चांदी वधारली आहे. चांदीच्या दरात तेजी राहणार असून पुढील आठवड्यात चांदी 78 हजार रुपयांवर जाऊ शकते.