---Advertisement---

खुशखबर! यंदा वरुणराजा सरासरीच्या १०३ टक्के बरसणार, स्कायमेटने वर्तवला अंदाज

---Advertisement---

नवी दिल्ली : यंदा वरुणराजा सरासरीच्या १०३ टक्के बरसणार असून, यंदाचा मान्सून (Monsoon 2025) सामान्य राहील, असा अंदाज भारतातील आघाडीची हवामानविषयक संस्था स्कायमेटने वर्तवला आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १०३ टक्के होईल. यात ५ टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

स्कायमेटचे जतिनसिंह यांच्या मते, ‘ला-निना’ या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ‘ला निना’चे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याऱ्या ‘अल-निनों’ची शक्यता नाकारण्यात आली आहे.

‘अल-निनों दक्षिणी दोलन फार तटस्थ राहणार असल्याने भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. ‘ला निना’ कमकुवत असणे आणि ‘अल-निनों’ प्रभावी नसत्याने मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. हिंदी महासागरातील स्थिती ‘अल-निनो’ प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो.

महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होणार

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्याने केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल.

जूनमध्ये सरासरीच्या ९६ टक्के

जून महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो. या महिन्यात १६५.३ मिमी पावसाची नोंद होईल. जुलै महिन्यात १०२.३ टक्के पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०८ टक्के पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १०४ टक्के पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment