---Advertisement---

मोठी बातमी! अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी

---Advertisement---

Ayodhya Update : अयोध्येतील भगवान श्री राम मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ईमेलमध्ये लिहिण्यात आले आहे की , मंदिराची सुरक्षा वाढवा, जर असे झाले नाही तर राम मंदिर बॉम्बने उडवून दिले जाईल. असा धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली असून, या प्रकरणाची सखोर चौकशी सुरु आहे.

राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना हा धमकीचा ईमेल मिळाला असून, मंदिर प्रशासनात खळबळ उडाली आहे. धमकीचा मेल मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

अयोध्यासह बाराबंकी आणि इतर शेजारील जिल्ह्यांमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम जन्मभूमी ट्रस्ट कार्यालयाचे अकाउंट ऑफिसर महेश कुमार यांच्या फिर्यादीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयांनाही उडवण्याची धमकी

अयोध्येतील राम मंदिराला धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांनाही बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. चांदौली डीएम कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे, या धमकीनंतर डीएम कार्यालयात खळबळ उडाली आहे.

माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक आणि पोलिस दल जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे.

ईमेलद्वारे चांदौली जिल्हाधिकारी कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीनंतर, एसपींकडून बॉम्ब स्क्वॉड आणि स्थानिक पोलिस स्टेशनच्या माध्यमातून ईमेल पाठवणाऱ्याची कसून तपासणी करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment