---Advertisement---

‘ही शेती आमची आहे, तुम्ही येथे पेरणी करू नका’, महिलेस अडवून जीवे मारण्याची धमकी

---Advertisement---

धुळे : साक्री तालुक्यातील भोरटेक येथे शेतात पेरणीचे काम सुरू असताना, ‘ही शेती आमची आहे, तुम्ही येथे पेरणी करू नका’, असे म्हणत महिलेस अडवून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी १५ जणांविरोधात साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावित्री कथ्थु बागुल (३६, रा. भोरटेक ता. साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आपल्या कुटुंबासमवेत दि. २२ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भोरटेक शिवारातील शेतात पेरणीचे काम करीत असताना पंधरा जणांनी एकत्र येत ही आमची शेती आहे, तुम्ही येथे काम करू नका, इथून घरी निघून जा, अन्यथा तुम्हाला ठार मारून टाकू. पेरणी करू देणार नाही, शेतातही येऊ देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली व धमकी दिली. या दरम्यान याप्रकरणी फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार साक्री पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास असई शेख करीत आहेत.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा


याप्रकरणी बाजया प्राण वळवी, सायजा भीमा चौधरी, भुरी पंडित चौधरी, मंगूबाई विजय वळवी (रा. ब्राह्मणवेल), पिंटी दिलीप भिल (रा. साबरसोंडा पिंजारझाडी), इमन दाजू भिल (रा. झिरणीपाडा), महारू गजमल भिल (रा. नवापाडा), मीना बकू भिल (रा. वाजदरे), अनिताबाई युवराज ठाकरे, युवराज सखाराम ठाकरे (रा. दहिवेल), सुपाबाई श्यामराव ठाकरे, ममती देवीदास ठाकरे, भारती सुरेश ठाकरे, मीराबाई राजू ठाकरे, पूनाबाई सावळदास ठाकरे (रा. भोरटीपाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---