Jalgaon News : तरुणीला थेट महाविद्यालय ईमारतीवरून खाली टाकण्याची धमकी, काय आहे कारण?

जळगाव : इंस्टाग्राम आयडी न दिल्याच्या कारणावरून तरुणीला थेट महाविद्यालय इमारतीवरून खाली टाकण्याची धमकी देण्यात आली. यावल तालुक्यात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात राहणार्‍या अल्पवयीन विध्यार्थीनी यावल येथील एका महाविद्यालयात शिकत आहे.  दरम्यान,  मंगळवार रोजी विध्यार्थीनी ही आपल्या मैत्रीणींच्या सोबत वर्गात बसलेली असतांना त्याच महाविद्यालयातील एक विध्यार्थी तिच्या जवळ येवून तिला ”तु इंस्टाग्रामवर रील्स बनवते का? तुझा इंस्टाग्रामची आयडी दे” अशी मागणी केली असता विध्यार्थीनीने त्याला मी इंस्टाग्राम वापरत नसल्याचे सांगितले.

यावेळी विध्यार्थ्याने लज्जा उत्पन्न होईल असे  बोलला असता तेव्हा विध्यार्थीनीने आपण महाविद्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटल्यावर तीला तुला महाविद्यालय ईमारती वरून खाली टाकण्याची धमकी दिली आहे. या अनुषंगाने यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहे.