---Advertisement---

State Budget 2024 updates : राज्य सरकारकडून गृहिणींना मोठं गिफ्ट; वाचा काय आहे ?

---Advertisement---

राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प आज शुक्रवारी सादर होत आहे. या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारकडून गृहिणींना मोठं गिफ्ट मिळालं आहे. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.

नेमकं अजित पवार काय म्हणाले?
महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.

दरम्यान, राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा करण्यात आली. ही योजना जुलै महिन्यापासून लागू होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment