चाळीसगाव : परमपूज्य मोरेदादा यांचा सहवास लाभलेल्या चाळीसगाव येथील श्री.स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालविकास केंद्रात उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख रंगराव तात्या भोसले यांनी दिली.
चाळीसगाव शहरातील अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरापूर रोड येथील साने गुरुजी नगर येथील श्री. स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केंद्रप्रमुख रंगराव तात्या भोसले यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की , हिरापूर रोड परिसरातील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसह श्री भगवान महादेव पिंडीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी दर गुरुवारी होणाऱ्या आरतींना सेवेकऱ्यांची गर्दी होत असते. याशिवाय केंद्रात दररोज श्री समर्थांना सेवेकऱ्यांकडून नैवेद्य दाखवून नियमित आरती केली जाते. केंद्रात कुठलाही शासकीय निधी न घेता केवळ सेवेकऱ्यांच्या आर्थिक योगदानातून भव्य मंडप नुकताच उभारण्यात आला आहे. याशिवाय इतरही आवश्यक ती कामे केली जात आहेत.
केंद्रात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थांची आकर्षक मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. ही साधारण चार फुटी अतिशय विलोभनीय मूर्ती राजस्थान-मधून आणली असल्याचे केंद्र प्रमुख भोसले यांनी दिली. १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रात नुकतेच नुतनीकरणाचे काम करण्यात आले. स्वामींचा गाभारा सुशोभित करण्यात आला असून यज्ञ मंडपाचे देखील नूतनीकरण करण्यात आले आहे.
शनिवारी व रविवारी दोन दिवस महापूजा विधी व स्वामी समर्थ सारामृताचे सामूदायिक वाचन होईल. सोमवारी ३ तारखेला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती व भगवान शंकराच्या पिंडेची स्थापना करण्यात येईल. यानिमित्ताने दुपारी बाराला महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ व महादेवाच्या पिंडीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तीन दिवस होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र प्रमुख रंगरावतात्या भोसले यांनी दिली. आभार सेवेकरी अजय इंगळे यांनी मानले.सोहळ्यासाठी श्री.स्वामी समर्थ सेवेकरी बंधु भगिनी मोठया प्रमाणावर परिश्रम घेत आहे.