Dahigaon Murder Case : तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, दोन अल्पवयीन मुलींचेही नोंदविले जबाब

---Advertisement---

 

Dahigaon Murder Case : यावल तालुक्यातील दहीगाव येथील २१ वर्षीय तरुणाच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांचीही रवानगी जळगाव जिल्हा करण्यात कारागृहात आली आहे.

दहीगाव येथील इम्रान युनूस पटेल (वय २१, मूळ रा. हनुमंतखेडा, ता. धरणगाव) याची दि. २९ ऑगस्टला रात्री सुरेश आबा नगर येथील ज्ञानेश्वर गजानन पाटील (१९) आणि गजानन रवींद्र कोळी (१९) या दोघांनी कोयत्याने वार करून हत्या केली होती.

त्यानंतर ते स्वतःहून पोलिसांना शरण आले. या प्रकरणात यावल शहरातील तुषार राजेश लोखंडे ऊर्फ जन्नत (१९) याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली.

या तिघांना प्रथम वर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांनी दि. ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

या गुन्ह्यात नागपूर जिल्ह्यातील आणि दहीगाव येथील दोन अल्पवयीन मुलींचे जबाबही पोलिसांनी नोंदविले आहेत. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---