कुबेश्वर धाम : मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे 16 फेब्रुवारीपासून सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सव सुरू झाला आहे. दरम्यान, गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तीन महिला बेपत्ता झाल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे.
मालेगाव येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय मंगलाबाई या रुद्राक्ष खरेदीसाठी रांगेत उभ्या असताना अचानक आजारी पडल्या, असे सांगितले जात आहे. उन्हात रांगेत उभी असलेली ही महिला रुद्राक्ष घेण्यासाठी थांबली होती. उन्हामुळे महिलेला चक्कर आली आणि ती खाली पडली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आणखी अन्य तीन महिला बेपत्ता माहिती सूत्रानुसार समोर येत आहे.