पोलीस भरतीची तयारी; अचानक एसटीने उडवलं, घटनेनंतर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

बीड : घोडका राजुरी येथे पहाटे ६ वाजता एसटी बसच्या धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या या तरुणांना सकाळच्या धुक्यामुळे बस चालक पाहू शकला नाही, अशी माहिती चालकाने दिली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांसाठी एसटी महामंडळाने १० लाख रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

बसच्या धडकेत मृत्यु झालेल्या तरुणांचे आयुष्य परत आणता येणार नाही, परंतु त्यांच्या कुटुंबीयांवरील दुःख कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने तातडीने मदतीचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदतीचा निर्णय जाहीर केला.

हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कालच्या बैठकीत एसटी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजनात स्वमालकीच्या ५ हजार नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय यापुढे भाडेतत्त्वावर बस भाड्याने न घेण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

हा निर्णय प्रवासी सेवेसाठी मैलाचा दगड ठरणार असून, एसटी महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.