---Advertisement---

Raver News : रावेर परिसरास वादळी पावसाने झोडपले!

---Advertisement---

रावेर : शहरासह परिसरातील खेडे गावास काल शनिवारी सांयकाळी अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. परिणामी केळीसह मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आमदार अमोल जावळे यांनी नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

वादळी पावसामुळे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला तर काही ठिकाणी वीज ताराही तुटल्या.

दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाच्या तडाख्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रावेर शहर व तालुक्यात काल शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे केळी सह मका पिकाचे नुकसान झाले .

रावेर व परिसरातील खेड्यात अनेक भागांमध्ये सायंकाळी चारच्या सुमारास सुरुवात झाली .मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होऊन बोराएवढी गारपीट झाली यामुळे केळी पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेला मका तसेच चारा याची नुकसान झाले .वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे .

आमदार अमोल जावळे यांच्या पंचनामा करण्याच्या सूचना

घटनेची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी. यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना अलर्ट केले आहे. प्रशासनाकडून आता पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या घटनेबाबत तहसीलदार बंडू कापसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “वादळ, पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरु असून संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.” वादळी हवामानामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment