Indian Railways : भारतीय रेल्वे प्रवासाची सोय आणि सुविधा आणखी सुधारित करण्यासाठी, भारतीय रेल्वेने एक महत्त्वाची सुविधा जाहीर केली आहे. यात आता PRS (Passenger Reservation System) काउंटरवरून घेतलेले तिकीट देखील ऑनलाइन रद्द करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट रद्द करण्यासाठी काउंटरवर जाऊन लांब वेटिंग लिस्टमध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही. हा सुधारित पर्याय, खासकरून आपत्कालीन परिस्थितीत, प्रवाशांना मदत करणार आहे.
PRC काउंटर तिकीट ऑनलाइन रद्द करण्याची प्रक्रिया
IRCTC ची अधिकृत वेबसाइट उघडा: IRCTC
‘Cancel Ticket’ या पर्यायावर क्लिक करा.
‘Cancel Counter Ticket’ हा पर्याय निवडा.
तिथे तुमचा PNR नंबर आणि ट्रेन नंबर टाका.
एक सिक्युरिटी कोड दिसेल, ते इंग्रजी अक्षर नीट भरा.
तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर OTP येईल, जो तुम्ही तिकीट बुक करताना दिला होता.
OTP रकान्यामध्ये भरा आणि ‘Submit’ करा.
त्यानंतर, एक डायलॉग बॉक्स दिसेल, जिथे तुम्हाला प्रवाशांची माहिती मिळेल.
तिकीट रद्द करण्यासाठी ‘Submit’ वर क्लिक करा.
तुमचे तिकीट यशस्वीपणे रद्द होईल.
हेही वाचा : विवाहबाह्य संबंधातून जन्मलेले अपत्य कोणाचे? सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
रिफंड प्रक्रिया
PRS काउंटरवरून खरेदी केलेल्या तिकीटासाठी रिफंड मिळवण्यासाठी प्रवाशांना नजीकच्या PRS काउंटरवर जाऊन तिकीट जमा करावे लागेल.
कन्फर्म तिकीटसाठी, ट्रेनच्या येण्याच्या 4 तास आधी PRS काउंटरवर जाऊन तिकीट रद्द करा.
RAC किंवा वेटिंग लिस्ट तिकीटसाठी, ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी PRS काउंटरवर जाऊन रिफंड मिळवता येईल.
हेही वाचा : हृदयद्रावक ! रेल्वे रुळ ओलांडण विद्यार्थिनीला पडलं महागात; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाची टीप : कधीही OTP शेअर करण्यापुर्वी, वेबसाइटची सत्यता तपासून पाहा, आणि फसवणूक टाळा.