Girad News : गिरड आणि पहाड परिसरात अनेक दिवसांपासून वाघीण आणि तिच्या दोन पिलांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जात होते. अशातच आज, 22 रोजी सकाळी 6 वाजता, धोंडगावसमोरील मुनेश्वर नगरजवळच्या हायवेवर झालेल्या अपघातात वाघिणीच्या एका पिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अपघातानंतर वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, मृत पिलाचा पंचनामा केला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघीण आता चवताडलेली आणि बिथरलेली असल्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ती कोणावरही हल्ला करू शकते, असा इशारा वनविभागाने दिला आहे.
हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड
सतर्कतेचा इशारा
वनविभागाने धोंडगाव, हुसेनपूर, शिरपूर, भवानपूर, हिवरा, वडगाव, अंतरगांव, गिरड आणि परिसरातील सर्व शेतकरी, मजूरवर्ग आणि नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. विशेषतः धोंडगाव परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळावे. वाघिणीच्या बिथरलेल्या अवस्थेमुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा
वनविभागाची विनंती
वनविभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, कोणीही एकटे फिरू नये, लहान मुलांना सुरक्षित ठेवावे, तसेच वाघीण दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी. स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Pune News : अखेर पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या पतीला मिळाला न्याय
सध्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, वनविभागाने विशेष पथक तयार करून वाघीण आणि उर्वरित पिलाचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.