नंदुरबार : जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर १२ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर मोलगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देव मोगरा मातेचे दर्शन घेऊन घराकडे परणाऱ्या भाविकांवर काळाने घात केला. हा अपघात अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई ते दहेल रस्त्यादरम्यान झाला.
या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर १२ जण जखमी झाले. त्यांच्यावर मोलगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
हा अपघात बँड गाडीचा झाला असून, देव मोगरा मातेचे दर्शन घेऊन घराकडे परतत असताना हा घा झाला. या अपघातात बँड गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
या प्रकरणी बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.