उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा ही रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ४ सप्टेंबर २०२३। श्रावण महिना सुरु असून अनेक जण उपवास करतात. पण उपवासाला काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा असते तर अशावेळी काय करावं हा प्रश्न पडतो यावेळी तुम्ही उपवासाची केळीची चकली हा पदार्थ करू शकता. हा पदार्थ घरी कसा बनवायचा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
साबुदाणा, केळ, हिरवी मिरची पेस्ट, मीठ

कृती
सर्वप्रथम, कच्ची केळी शिजवून घ्या नंतर त्याची साल काढून घ्या यानंतर केळी मिक्सर मधून काढून घ्या. यानंतर साबुदाणा भिजत घाला आणि त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ घाला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या यानंतर कागदावर चकल्या पाडा नंतर त्या उन्हात वाळवायला ठेऊन द्या. नंतर तुम्ही तेलामध्ये काढून खाऊ शकता.