पत्नीचं अनैतिक संबंध, पतीला लागली कुणकुण; रात्री जोरदार भांडण अन् पुढे जे घडलं त्याने सर्वच हादरले

बिहार ।  मुंगेर जिल्ह्यात पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) रात्री ३५ वर्षीय मोहम्मद अरमान या व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू आहे.

मोहम्मद अरमान आणि त्याची पत्नी यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना पाच मुलं असून संपूर्ण कुटुंब मुंगेरमधील एका भाड्याच्या घरात राहत होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी अरमानच्या पत्नीची गावातील एका युवकाशी ओळख झाली. सुरुवातीला मैत्री, नंतर हे नातं प्रेमसंबंधात बदललं. दोघेही लपून भेटू लागले, मात्र याची कुणकुण अरमानला लागली.

हेही वाचा : मधुचंद्राची रात्र; नववधूनं केलं असं काही की नवऱ्यावर आली रडण्याची वेळ

पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्यानंतर अरमान आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होऊ लागले. कुटुंबात रोजच कलह सुरू झाला होता. अखेर, गुरुवारी रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झालं, त्यानंतर संतापाच्या भरात मोहम्मद अरमानने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

गुरुवारी रात्री घडलेली घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अनेक वेळा हाक मारूनही घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. आत प्रवेश केल्यावर त्यांनी अरमानचा मृतदेह लटकलेला पाहिला आणि तत्काळ पोलिसांना कळवलं.

हेही वाचा : आरबीआय’ने घातली ‘या’ बँकेवर बंदी, आता कोणताही ग्राहक काढू शकणार नाहीत ‘पैसे’

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तसेच अरमानच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू आहे.

गावात चर्चांना उधाण, आरोपी पत्नीचा शोध सुरू

या घटनेनंतर गावात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीने इतकं टोकाचं पाऊल उचलणं, हे धक्कादायक असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. पोलिसांनी तपास अधिक गतीमान केला असून लवकरच आरोपी महिलेचा शोध घेऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.