जळगाव : मानसिकदृष्ट्या कमकुवत, जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास निघालेल्या महिलेला पोलिसांमुळे नवे आयुष्य लाभले आहे. पोलिसांनी त्या महिलेला विश्वासात घेऊन आत्महत्येचा विचार कसा अयोग्य आहे, हे पटवून दिले. विशेषतः पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरीकांकडून कौतूक होतय.
सोनाली काळू मते (वय-३४) रा. गणेश नगर, जिल्हापेठ, ह्या जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथे जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास जात असताना काही लोकांनी पाहिले. जळगाव शहरातील मेहरूण परिसरात शुक्रवार, १५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. नागरिकांनी तात्काळ याची खबर ११२ क्रमांकावर डायल करून पोलिसांना दिली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ नितीन पाटील, चंद्रकांत पाटील व महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला यांनी याची दखल घेत सदर सोनाली यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना तिची आई व मावशी – सत्यभामा संतोष पाटील, (वय-६५) रा. नवीन जोशी कॉलनी, जळगाव यांच्या ताब्यात सुरक्षित देण्यात आले आहे.