येशूला भेटायचेच असा ध्यास घेऊन तब्बल ७३ जणांनी गमावला जीव

केनिया : पादरी पॉल मॅकेंझीने अनुयायांना येशुला भेटण्यासाठी आमरण उपोषण करण्यास सांगितले. यात ७३ जणांनी जीव गमावल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात मुलांचादेखील समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पादरी पॉल मॅकेंझीच्या मालकीच्या जमिनीत खोदकाम सुरुच आहे. अनेक कबरी खणल्या जात आहेत. पादरी मॅकेंझीला १४ एप्रिलला अटक करण्यात आली आहे. Kenya

येशूला भेटायचेच असा ध्यास घेऊन किल्फी प्रांतातील काही जणांनी गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चचे पाद्री पॉल मॅकेन्झी याची भेट घेतली. या पाद्रीने तुम्हाला येशूला भेटायचे असेल तर त्यांनी उपाशी राहून स्वतःला पुरून घेतले तर ते येशूला भेटतील आणि स्वर्गात जातील असा सल्ला दिला. ख्रिश्चन धर्मगुरूच्या सांगण्यावरून २९ जणांनी स्वतःला किल्फी प्रांतातील शाकाहोला जंगलामध्ये स्वतःला पुरून घेतले. मात्र काही दिवस उलटल्यानंतर दुर्गंधी पसरल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दुर्गंधी पसरलेल्या भागात खोदायला सुरवात केली. तेव्हा त्यांचा हाती एक एक मृतदेह लागला. 

Kenya

पोलिसांनी एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आहे. या सर्वाना कुटुंबासह एकत्र येशूला भेटायचे होते. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. पाद्री पॉल मॅकेन्झी याच्यामुळे पूर्वीही दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्या मुलांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्याला १०,००० केनियन शिलिंग म्हणजेच ६,००० रुपयांच्या दंडावर सोडण्यात आले होते.