टीओडी वीज मीटरमध्ये फेरफार; दोन ग्राहकांवर गुन्हा दाखल

---Advertisement---

 

धुळे : महावितरणाच्या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी धुळे शहरतील दोन व्यक्तींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणाकडून वीज ग्राहकांकडे बसविण्यात येत स्मार्ट टीडीओ मीटर येत आहे. या टिओडी मीटरमुळे वीज ग्राहकांना वेळेत व अचूक बिल मिळत आहे , महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी मीटर सर्वत्र बसविले जात आहेत. टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते महावितरणाच्या सर्व्हलला जोडलेले असल्याने मीटरचा रिअल टाइम डाटा उपलब्ध होतो.

मीटर नादुरुस्त झाल्याची तसेच मीटरमध्ये कुणी फेरफार केला तर त्याची थेट माहिती त्याच क्षणी महावितरणाला मिळत आहे. धुळे जिल्ह्याच्या विविध भागात महावितरणाने गेल्या काही दिवसांत विशेष पथकाद्वारे केलेल्या तपासणीत टीओडी मीटरमध्ये वीजचोरी केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

महावितरणाच्या लालबाग कक्षाचे सहायक अभियंता हे कार्यालयीन सहकाऱ्यांसह वीजजोडणी तपासणी करत असताना मच्छीबाजार येथे मोहम्मद सलीम मोहम्मद मुस्तफा या ग्राहकाचे बीजमीटर व वीज वापराची तपासणी तसेच वीजपुरवठ्याची व संपूर्ण जोडभाराची तपासणी केली असता, त्या ठिकाणी वीजचोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले.

टीओडी मीटर हे वीज नियामक आयोगाद्वारे प्रमाणित आणि पूर्णतः अचूक असलेले मीटर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. प्रोग्राम आधारित असल्याने मीटरचे मासिक रीडिग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---