तरुण भारत लाईव्ह। १४ फेब्रुवारी। १४ फेब्रुवारी हा दिवस भारताच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंद आहे. या दिवशी दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर भ्याड हल्ला केला होता. त्यांच्या या हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते .या घटनेने संपूर्ण देश हादरला . आज या हल्ल्याला चार वर्षे पूर्ण झाली असून देशभर शहिदांना श्रद्धांजली वाहिले जात आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 2019 मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांनी ट्विट केले, ‘आमच्या शूर वीरांना आठवत आहे ज्यांना आम्ही पुलवामामध्ये या दिवशी गमावले. त्यांचे सर्वोच्च बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांचे धैर्य आपल्याला एक मजबूत आणि विकसित भारत तयार करण्यासाठी प्रेरित करते. 14 फेब्रुवारी रोजी एका आत्मघाती बॉम्बरने सीआरपीएफच्या ताफ्यावर आपले वाहन घुसवून स्वत:ला उडवले. या अपघातात 40 हून अधिक जवानांना प्राण गमवावे लागले. प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले.
नक्की काय घडले ?
14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी तीनशे किलो स्पोटकानी भरलेल्या वाहनाने CRPF च्या वाहनाला धडक दिली आणि लष्करी ताफा उडवला पुलवामा हल्ला भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यापैकी एक मानला जातो. यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले. मात्र यानंतर भारताने यापूर्वी कधी झालं नव्हतं ते केलं , भारताने या भ्याड दहशतवादी हल्ल्याला अवघ्या बारा दिवसात प्रत्युत्तर दिलं
आपल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राइकच्या रूपाने प्रत्युत्तर दिलं आणि अवघ्या बारा दिवसात नापास पाकिस्तानकडून बदला घेतला. पुलवामाच्या भ्याड हल्ल्यात चाळीस वीर जवान शहीद झाले होते. पुलवामा जिल्ह्यातील अवंती पोरा जवळील लेथपोरा भागात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश -ए- मोहम्मद ने घेतली. त्यानंतर भारताने अवघ्या बारा दिवसात नापाक पाकिस्तानकडून बदला घेतला . 26 फेब्रुवारीला बालाकोट सर्जिकल स्ट्राइक करून जैश -ए- मोहम्मद च्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.
केंद्रीय तपास संस्थेने (एनआयए) मार्च 2019 मध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. martyrs of Pulwama तपास एजन्सीने सांगितले की, गुन्हेगारांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील हँडलरने प्रशिक्षण दिले होते. पुलवामा येथील सीआरपीएफ ताफ्यावर हल्ला आणि कट रचल्याप्रकरणी दिल्लीस्थित पटियाला हाऊस कोर्टाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.