जळगाव । सोन्या-चांदीच्या दरात दररोज बदल होत असतो. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे. दरम्यान, सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आज सोन्याच्या भावात घसरण झालेली दिसून येतेय.
जळगावातील आजचा सोन्याचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,300 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी मागील सत्रात सोन्याचा भाव 60,600 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका इतका होता. म्हणजेच सोन्याच्या किमतीत 300 रुपयाची घसरण झाली आहे. उच्चांक दरापासून आतापर्यंत सोने जवळपास 1000 रुपयांहून अधिकने घसरले आहे. दरम्यान, दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 63000 ते 65000 हजारापर्यंत जाणार असायचा अदांज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
जळगावातील आजचा चांदीचा दर?
मागील काही दिवसापासून चांदीच्या किमतीत मोठी चढ-उतार दिसून आली. सध्या जळगावमध्ये एक किलो चांदीचा दर 75000 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. दरम्यान, 14 एप्रिल रोजी जळगावमध्ये चांदीच्या किमतीने 77,500 रुपयाचा (विनाजीएसटी) उच्चांकी दर गाठला होता. तेव्हापासून आतापर्यंत चांदीच्या किमतीत 2500 हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. मात्र दिवाळीपर्यंत चांदी 80000 हजार रुपयाचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.