आजचे राशीभविष्य; या राशीच्या लोकांना व्यापारात प्रयत्नांच्या तुलनेन अधिक लाभ होतील

तरुण भारत लाईव्ह । ११ एप्रिल २०२३ : दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो.  दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष रास

नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल.

वृषभ रास

दिवसभरात आशाजनक परिस्थिती निर्माण होईल. व्यवसाय व्यापारातील जागेचा प्रश्न मिटेल.  दुरचे प्रवास घडणार आहेत. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदादी पार पाडाल. दिवसभर मन प्रसन्न राहिल. लेखन कला क्षेत्रातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील.

मिथुन रास

नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.  कामकाजासाठी शुभदिवस आहे. स्वता:ला सिद्ध कराल. मित्रांकडून मदत मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात यश येईल.

कर्क रास

प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. संशोधन पर अभ्यासाच्या प्रारंभास आजचा दिवस उत्तम आहे. मनात प्रसन्नता असेल. मित्र मैत्रिणीकडून सहकार्य लागेल. प्रसन्नता पूर्वक दिवस आहे.

सिंह रास

काही मनस्तापा सारख्या घटना घडतील. ताणतणाव जाणवेल. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. आर्थिक व्यवहार अत्यंत सावधानीपूर्वक करावेत. कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा मोठे धाडसी निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणींबरोबर व्यवहार करताना जपून करा. अनिद्रेचा त्रास होऊ शकतो. मन अस्वस्थ राहील. प्रकृतीवर लक्ष द्या.

कन्या रास

क्रिएटीव्ह मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकरिता आज शुभ योग आहे. शासकीय योजना आणल्या जातील. रखडलेले प्रकल्प पुर्णत्वास जातील. शेअर बाजार मधील कामासाठी शुभ दिवस आहे. आपल्या हातून शुभ कार्य घडतील. महिलावर्गाकडून विशेष लाभ होईल.

तूळ रास

नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे योगआहेत. काहींना नोकरीत प्रमोशन मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना बलीना मोठे यश प्राप्त होईल. नातेवाईकाकडून सहकार्य लाभेल.

वृश्चिक रास

सर्वच बाबतीत समाधान लाभेल. मनाप्रमाणे घटना घडतील. आध्यात्मिक देवधर्म यावर श्रद्धा वाढेल. मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. नोकरदारांना नोकरीत उत्कृष्ट प्रस्ताव येतील.  उपासना व गुढशास्त्राची आवड निर्माण होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह लाभेल.

धनु रास

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बोलघेवडेपणा शक्यतो टाळा. अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. चिंता वाढविणारा दिवस असुन मनावर नियंत्रण ठेवून आज वाटचाल करा.

मकर रास

काहीना पगारवाढ व बदलीची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.घरातील अडचणी दूर होतील. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत. आंनदायक वातावरण राहिल. आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्यावे.

कुंभ रास

आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल.  प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे.

मीन रास

बुद्धीवर पडदा पडल्यासारखा अनुभव कराल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायदा पाहून अविचारी गुंतवणूक करू नका. विचार पूर्वक निर्णय घ्या.