आजचे राशीभविष्य; या राशीच्या लोकांनी नोकरीत अतिउत्साही आणि अतिरकपणा टाळा.

तरुण भारत लाईव्ह । १४ एप्रिल २०२३। दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष रास 
आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल.  कौटुंबिक पातळीवर समाधानी राहाल. भाऊबहिणीकडून पाठबळ मिळेल. भांवडाकडून आर्थिक मदतीची शक्यता आहे. सुखात समाधानात वृद्धी करणारा दिवस आहे. वाहन घर खरेदीचा योग आहे. स्थावर मालमत्तेत वाढ होईल.

वृषभ रास
प्रसन्नतापूर्ण आणि मन आनंदी राहील. आध्यात्माकडे ओढ राहील. वाहन स्थावर जंगम मालमत्ता यात वृद्धी होईल. व्यापारी वर्गासाठी धन वृद्धिचा दिवस आहे. सरकारी कामकाजात यश येईल. गृहसौख्य उत्तम लाभेल. कुटुंबाविषयी स्नेह वाढेल.  कार्यक्षेत्रात प्रगती कराल. वैवाहिक जीवनात प्रेम व आपुलकी राहील.

मिथुन रास 
भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. स्वभावात राग मस्तर निर्माण होईल. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. कामात रिस्क घेवू नका.  मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल.

कर्क रास
नवीन प्रकल्प कामे मिळतील. मित्र-मैत्रिणीमध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. व्यापारात नफ्यात वाढ होणार आहे. कौटुंबिक सौख्य ही उत्तम लाभेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि आमलातही आणाल. मनोधैर्य चांगलेच उचांवेल. जोडीदाराकडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल. मन आंनदी राहील.

सिंह रास
नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.  मानसिक स्वास्थ लाभेल. प्रवासातून लाभ होतील.

कन्या रास
आपल्या कार्यक्षेत्रात वाढ आणि विस्तार होईल. नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. बढ़ती आणि प्रमोशनचे योग आहेत. आजचा दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल. राजकिय सामाजिक कलाक्षेत्रातील व्यक्तींना योग्य लाभ आणि मानसन्मान प्राप्त होईल. शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात यश लाभेल. परदेशगमन होईल.

तूळ रास
कलाकारांसाठी विशेषत: उत्तम दिवस आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायिकांना नफ्यात वाढ होईल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवसभर मन प्रसन्न असेल. पत्नी सौख्य लाभेल. शासकीय कामकाजात दिनमान उत्तम आहे. नवीन योजनाची सुरूवात होईल. परमेश्वरावर श्रद्धा वाढेल. आध्यात्मिक कार्य घडेल.

वृश्चिक रास
व्यापारात भागीदारीत नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले आणि आनंददायी राहील. विद्याभ्यासात प्रगती राहील. संशोधनपर केलेल्या कामास मानसन्मान पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

धनु रास
गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा.  घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. दूरवरचे प्रवास टाळावेत.

मकर रास
नोकरीत अतिउत्साही आणि अतिरकपणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावू शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे.

कुंभ रास
तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनोबल उंचावेल. मनशांती लाभेल.

मीन रास
आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. अचानक आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. तरुण तरुणींना नोकरी मिळण्यासाठी उद्याचा दिवस उत्तम राहाल. स्पर्धेमध्ये यश मिळेल. एकंदरीत आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणारा दिवस आहे.