आजचे राशिभविष्य; या राशींच्या लोकांनी अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका

तरुण भारत लाईव्ह । १० मे २०२३। दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास 
मनाची चलबिचल वाढेल. व्यापारात देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध रहा. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविदाचे प्रसंग टाळा. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा.

वृषभ रास 
नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. वैवाहिक जीवनात क्षमाशील राहणे सर्वोत्तम ठरेल. आज प्रवास सुखकर होईल. प्रवासातून लाभ होतील.

मिथुन रास 
आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. व्यापारात वाढ होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. शासकीय योजनेतून लाभ घडेल.कौटुंबिक सौख्य राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे.

कर्क रास 
व्यापारात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली मनासारखी होईल. नव्या संधीचा फायदा होईल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील.

सिंह रास 
आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये, याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. अपघात भय संभवते.

कन्या रास 
आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत.  आरोग्य उत्तम राहील. दुरच्या प्रवासातून लाभ होतील. व्यसनापासून दूर राहा. दूरवरचे प्रवास घडतील. दिनमान उत्तम राहील.

तूळ रास 
आपसातील वाढ समजदारीने मिटवा.  सामाजिक कार्यक्रम साहित्यिक चळवळ व्यासपीठ इत्यादी माध्यमातून आपला नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.

वृश्चिक रास 
प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. व्यापारात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल.

धनु रास 
नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वाईट सवयीचा त्याग करा. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे.

मकर रास 
गुप्तता महत्वाची कागदपत्रे घरातील रोकड यांची याबाबत दुर्लक्ष होता कामा नये. आपल्या महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. मनस्वास्थ सांभाळा. सकारात्मक विचार ठेवा.

कुंभ रास 
अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका.  आपल्या व्यसनांवर आवर घाला. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

मीन रास 
गुप्तता महत्वाची कागदपत्रे घरातील रोकड यांची याबाबत दुर्लक्ष होता कामा नये. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरा संबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल.