तरुण भारत लाईव्ह । १४ मे २०२३। दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे १२ राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
वादविवादातून मनस्ताप होईल. खर्चात वाढ होईल. कायदेशीर प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा.
वृषभ रास
जोडीदाराशी विवाद टाळा. संततीविषयी चिंता निर्माण होईल. त्यांच्या विद्याभासाकडे लक्ष द्यावे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात.
मिथुन रास
नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. राजाश्रय मिळेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. आरोग्य उत्तम राहील.
कर्क रास
शैक्षणिक कार्यात यश मिळेल. खर्च मात्र विचार करून करा. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात नवीन भागीदारासोबत नवीन प्रकल्पाची सुरुवात कराल.
सिंह रास
स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. भांवडाकडून मदत मिळेल.
कन्या रास
रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दूरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल.
तूळ रास
कामाच्या ठिकाणी ताणतणात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारात भागीदारासोबत वादविवाद टाळा. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. शारीरिक दृष्टीकोनातून मधुमेह पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. आर्थिक हानीची शक्यता वाटते.
वृश्चिक रास
वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे.
धनु रास
नोकरीत वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. शारिरिक त्रास जुना आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिनमान आहे.
मकर रास
रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील.
कुंभ रास
नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाईगडबड करू नका. दुसऱ्याच्या कामात मात्र हस्तक्षेप करू नका.
मीन रास
आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. चंद्रबल उत्तम आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल.