---Advertisement---

आजचे राशिभविष्य; या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २२ मे २०२३। दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास
व्यवसाय व्यापारातील जागेचा प्रश्न मिटेल. नोकरी व्यवसायानिमिल परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदारी पार पाडाल. दिवसभर मन प्रसन्न राहील. लेखन कला क्षेत्रातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील.

वृषभ रास
मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. शासकीय कामकाजासाठी शुभदिवस आहे. स्वता:ला सिद्ध कराल. मित्रांकडून मदत मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात यश येईल.

मिथुन रास
नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

कर्क रास
प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळेल. मलेखन क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील. संशोधन पर अभ्यासाच्या प्रारंभास आजचा दिवस उत्तम आहे. मनात प्रसन्नता असेल.

सिंह रास
ताणतणाव जाणवेल. कौटुंबिक खर्च वाढेल. आर्थिक व्यवहार अत्यंत सावधानीपूर्वक करावेत. जामीन राहू नका. मोठे धाडसी निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणींबरोबर व्यवहार करताना जपून करा. अनिद्रेचा त्रास होऊ शकतो.

कन्या रास
धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नवीन कल्पना आमलात आणा. रखडलेले प्रकल्प पुर्णत्वास जातील. शेअर बाजार मधील कामासाठी शुभ दिवस आहे. आपल्या हातून शुभ कार्य घडतील. स्त्रीयाकडून विशेष लाभ होईल.

तूळ रास
नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. काहींना नोकरीत प्रमोशन मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या आणि मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल.

वृश्चिक रास
सर्वच बाबतीत समाधान लाभेल. मनाप्रमाणे घटना घडतील. आध्यात्मिक देवधर्म यावर श्रद्धा वाढेल. मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. नोकरदारांना नोकरीत उत्कृष्ट प्रस्ताव येतील. उपासना व आध्यात्माची आवड निर्माण होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह लाभेल.

धनु रास
बोलघेवडेपणा शक्यतो टाळा. अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल, प्रकृतीकडे लक्ष द्या. चिंता वाढविणारा दिवस असून मनावर नियंत्रण ठेवून आज वाटचाल करा.

मकर रास
व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. आंनदायक वातावरण राहील. आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्यावे.

कुंभ रास
खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारीनुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. व्यवहार काळजीने गुप्तशत्रुपासुन त्रास जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या.

मीन रास
आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment