आजचे राशीभविष्य; या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

तरुण भारत  लाईव्ह । १७ एप्रिल २०२३। दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष रास 
कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखकवर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती मिळेल. दूरच्या प्रवासातून आर्थिक लाभ होतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील.

वृषभ रास
नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा.  पत्नी साथीदारांच्या कामावर लक्ष असू द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबातील इतर सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. मनोबल मानसिक स्वास्थ सांभाळा.

मिथुन रास 
आज चांगली फले मिळतील. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल.  बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. संतसाहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल. संततीची काळजी घ्या. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका.

कर्क रास
सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. नोकरी परिश्रमाचा पूर्ण मोबादला मिळेल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. काहींना प्रमोशन व वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.

सिंह रास
राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दूरचा प्रवास घडणार आहेत.  निरनिराळ्या सूचना कल्पना रोजगारात व्यावसायिकदृष्ट्या आमलात आणा. भाग्यदायक दिनमान राहील.

कन्या रास
आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे.  मागील स्मृती उजाळल्याने दुखः होऊ शकते. शक्यतो प्रवास टाळा.अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.

तूळ रास
व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकांना मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहू नका. अन्यथा फसवणूक किंवा आर्थिकहानी होण्याची शक्यता आहे.  पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक रास
शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी. घरातील वातावरण बिघणार नाही, याकडे लक्ष द्यावे. सावधानीपूर्वक वाटचाल करावी.

धनु रास
नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. कौटुंबिक जीवन सुखी राहील.

मकर रास
सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल.घरासंबंधी समस्या दूर होतील.आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात साथीदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील.  धनसंचयात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाचा संधी मिळेल. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. समाजकारणात प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ रास
कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भभवतील. कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना साधनेसाठी अनुकुल दिवस आहे.

मीन रास
आज व्यवहार चातुर्य आणि संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होणार आहे. योग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोशपूर्वक कामात रस घ्याल. विद्वान लोक भेटतील. कौटुंबिक समाधान लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील.