---Advertisement---

आजचे राशिभविष्य; ‘या’ राशींच्या लोकांसाठी सुखकारक दिनमान

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २० मे २०२३। दैनिक राशिफल  हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास
व्यापारात बदल प्रगती घडविणारे ठरतील.  तरुण तरुणींना नोकरी मिळण्यासाठी आजचा दिवस उत्तम राहील. एकंदरीत आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणारा दिवस आहे.

वृषभ रास 
अकस्मात धनलाभ होऊ शकतात. सामाजिक कार्यात मान सम्मान वाढेल. गृहसौख्यात उत्तम संयोग राहील. प्रसन्नतापूर्ण आणि आंनदी मन राहील. वाहन स्थावर जंगम मालमत्ता यात वृद्धी होईल.

मिथुन रास 
नवीन प्रकल्प कामे मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल.

कर्क रास 
भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा.स्वभावात राग निर्माण होईल.  आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासून जाल.

सिंह रास 
नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल.  सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील.

कन्या रास 
नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. राजकिय सामाजिक कलाक्षेत्रातील व्यक्तींना योग्य लाभ व मानसन्मान प्राप्त होईल. शैक्षणिक कार्याने बौद्धिक कार्यात यश लाभेल. परदेशगमन होईल. प्रवासातून आर्थिक लाभ होतील.

तूळ रास 
कलाकारांसाठी विशेषत: उत्तम दिवस आहे.  व्यवसायात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. आपल्याला यश नक्की मिळेल. शासकीय कामकाजात दिनमान उत्तम आहे. नवीन योजनाची सुरूवात होईल. परमेश्वरावर श्रद्धा वाढेल.

वृश्चिक रास 
चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. दूरवरचे प्रवास टाळावेत.आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्यावे.

धनु रास 
नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील.  मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. विद्याभ्यासात प्रगती राहील. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा.

मकर रास 
मानसिक स्वास्थ सांभाळा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते.

कुंभ रास 
तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनोबल उंचावेल.

मीन रास 
शासकीय कामकाजात यश येईल. राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment